Friday, 7 February 2020

कोरोनावर प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या टीमला पाहिलं यश..

चीनमधून जगभर पसरलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर प्रतिबंधक लस तयार करण्याचं काम अनेक प्रयोगशाळांमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. चीनमध्ये यासंबंधी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. तर चीनबाहेरही अनेक देशांमधले शास्त्रज्ञ यासंबंधी काम करत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियातल्या एका शास्त्रज्ञांच्या टीमला या प्रक्रियेतलं पहिलं यश मिळालं आहे. विशेष म्हणजे या टीमचं नेतृत्व प्रा. एस. एस. वासन या एका भारतीय शास्त्रज्ञाकडे आहे. अशी माहिती समोर आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या या शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूची लॅबमध्ये निर्मिती केली आहे.
रोगप्रतिबंधक लस तयार करण्याच्या दृष्टीने या विषाणूचा प्रीक्लिनिकल अभ्यास आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियातल्या कॉमनवेल्थ सायंटिस्ट अँड इंड्स्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन (CSIRO)या संस्थेतल्या शास्त्रज्ञांना हे पहिलं यश मिळालं आहे. प्रा. एस. एस. वासन यांच्या नेतृत्वाखाली हे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. हे काम लसनिर्मितीच्या दृष्टीने पहिलं मोठं यश आहे. या विषाणूंची निर्मिती झाल्यानंतर त्यांचा अभ्यास शक्य असल्याचे वासन यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे.
कोरोना व्हायरसने आतापर्यंत 600 लोकांचा बळी घेतला आहे. हवेतून पसरणारा हा विषाणू असल्याने त्याचा संसर्ग वेगाने पसरतो आहे. ताप, सर्दी, अशी सामान्य लक्षणं असल्यानं या रोगाचं निदान व्हायला वेळ लागला. आता कोरोना व्हायरसची भीषणता हळूहळू जगासमोर येत आहे. वासन यांनी डेंग्यू, झिका आणि चिकुनगुन्या या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचा अभ्यास केला आहे. आता nCov अर्थात कोरोना विषाणूचा ते अभ्यास करत आहेत.
प्रा. वासन मुळचे भारतीय आहेत. त्यांनी BITS पिलानी आणि बेंगळुरूच्या IISC मधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर डॉक्टरेट करण्यासाठी ते ब्रिटनला गेले. तिथे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ट्रिनिटी कॉलेजमधून त्यांनी संशोधन केलं.

Reference=http://dhunt.in/8syKt?s=a&ss=pd
कोरोनावर प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या टीमला पाहिलं यश, 'हा' भारतीय शास्त्रज्ञ करतोय नेतृत्त्व
http://dhunt.in/8syKt?s=a&ss=pd
Source : "महाराष्ट्र देशा" via Dailyhunt

अॅप डाउनलोड करा
http://dhunt.in/DWND

No comments:

Post a Comment